प्रेमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं – नारायण पूरी

प्रेमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं – नारायण पूरी

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

कवी • (1990 - )

प्रेमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं

प्रेमाचा जांगडगुत्ता गं… जीव झाला हा खलबत्ता गं…
उखळात खुपसले तोंड प्रिये… मुसळाचा तुंबळ रट्टा गं…!
 
तू लाजाळू परी कोमल गं… मी निवडुंगाचे झुडूप प्रिये…
तू तुळशीवाणी सत्त्वशील… मी आग्याबोंड वेताळ प्रिये…
तू विडा रंगीला ताराचा… मी रसवंतीचा चोथा गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं… जीव झाला हा खलबत्ता गं…
 
तू सुप चायनीज चटकदार… मी झेड-पीची सुकडी खिचडी…
तू बटर नान तंदूर गरम…मी हायब्रीड भाकर धांदाडी…
तू पनीर कोपता काजुकरी… मी हिरव्या मिर्चीचा ठेचा गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं… जीव झाला हा खलबत्ता गं…
 
तू वीणा हरीच्या हाताचा… मी तुन तुन तार तूनतूण्याची
तू मधुर सूर पकवाज्याचा…मी कड कड घाई हलगीची…
तू आषाढवारी अभंग गं… मी परमिटरूमचा गुत्था गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं… जीव झाला हा खलबत्ता गं…
 
तू चपळ नागीन सळसळती… मी मांडूळाची चाल प्रिये…
बुलेट ट्रेनने फिरसील तू… मी लोकलने बेहाल प्रिये…
तू समृद्धी हायवे चौपदरी… मी खड्ड्यातून रस्ता गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं… जीव झाला हा खलबत्ता गं…
 
तू मनसेचे ऐलान प्रिये… मी सावध धनुष्यबाण प्रिये..
ही वेळ हातावर आलेली… तू कमळापरी बेभान प्रिये…
तू सत्ताधारी माजोरी… मी हताशलेली जनता गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं… जीव झाला हा खलबत्ता गं…
 
तू नकाशात अन्‌ यादीतही… 
अन्‌ माझा मतदार केंद्रातून गायब पत्ता गं…
तू अच्छे दिनचा आभास प्रिये… 
मी शेतकरी आत्महत्येचा फास प्रिये…
तू विदेशवाऱ्या हॉलिडेज… माझी जगण्याची भ्रांत प्रिये…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं… जीव झाला हा खलबत्ता गं…
 
तू मुसोलिनी, हिटलरवादी… 
मी देशाचा आंदोलनातील फुटका माथा गं..
तू नामांतर, तू विषयांतर… मी दंगलीमध्ये होतो अमर…
मी पानसरे! मी दाभोळकर!… 
तू स्वातंत्र्याचा नुसता बोभाटा गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं… जीव झाला हा खलबत्ता गं…
उखळात खुपसले तोंड प्रिये… मुसळाचा तुंबळ रट्टा गं…!
Image by Canva

शब्दार्थ :

कर्दमलेले : भिजलेले     कारभारणी : पत्नी      गंगामाई (noun) : गंगा नदी / नदी

इतर कवी

Scroll to Top