अरे संसार संसार (Are Sansar Sansar) – Bahinabai Chaidhari

‘अरे संसार संसार’ ही कविता बहिनाबाई चौधरी यांनी रचलेल्या कविते मधुल काही निवडक सर्वोत्कृष्ट कविते मधील एक आहे. प्रस्तुत कविता बहिणाबाईंच्या “बहिणाबाई चौधरी यांच्या कविता” या कविता संग्रहातून घेतली आहे. एक गरीब कुटुंब आयुष्याच्या वळणावर विविध सुख दुःखाचा सामना करतो आणि हसत खेळत तो पूर्ण करतो हे या कवितेतून कवीने मांडले आहे. जीवन म्हणजे काय असतं, आणि जीवन कसे जगावे हे या कवितेतून कवी सांगण्याचा प्रयत्न करतात.

कवी • (1912 - 1999)

अरे संसार संसार

अरे संसार संसार
जसा तावा चुल्यावर
आधी हाताले चटके
तवा मियते भाकर

करा संसार संसार
खोटा कधीं म्हणूं नहीं
राउळाच्या कयसाले
लोटा कधीं म्हणूं नहीं

अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येडया, गयांतला हार
म्हणूं नको रे लोढणं

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एक तोंडा मधी कडू
बाकी अवघा लागे गोड

अरे संसार संसार
म्हणू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मढी गोंडंब्याचा ठेवा

देशा संसार संसार
शेंग वरतण कांटे
अरे, वरतून कांटे
मधीं चिक्ने सागरगोटे

ऐका संसार संसार
दोन्ही जीवाचा इचार
देतो दुःखाले होकार
अन सुखाले नकार

देखा संसार संसार
दोन्ही जीवाचा सुधार
कधी नगद उधार
सुखादुखाचा बेपार

अरे संसार संसार
असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर
त्याच्या वरती मदार

असा संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मंग जीवाचा आधार !

Image by Freepik

शब्दार्थ :

कर्दमलेले : भिजलेले     कारभारणी : पत्नी      गंगामाई (noun) : गंगा नदी / नदी
Scroll to Top